भोसरी ते निघोजे बस सेवेला प्रारंभ! महानगाव ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश

चिंबळी : खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील महानगाव (निघोजे) ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, भोसरी ते निघोजे (मार्ग क्र. 349) बस सेवा सुरू झाली आहे. यासाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, ग्रामपंचायतीने त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
या बस सेवेच्या शुभारंभप्रसंगी महानगाव निघोजे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच दिपक कांबळे, माजी उपसरपंच सागर येळवंडे, ग्रामपंचायत अधिकारी नितीन नाईकडे, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समाधान येळवंडे, सागर येळवंडे, संदीप येळवंडे यांनी पाठपुरावा केला. शिवभक्त अनिकेत घुले यांच्या हस्ते बसचालक तुषार मस्के आणि वाहक गौरव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच अजित येळवंडे, ग्रामपंचायत सदस्या इंदिरा फडके, मनिषा बेंडाले, स्नेहा फडके, रूपाली येळवंडे, अलका येळवंडे, छाया येळवंडे यांच्यासह माजी व आजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





