Govinda Exit Politics : अभिनेता गोविंदाने राजकारण सोडलं; सांगितलं सर्वात मोठं कारण… VIDEO
गोविंदाने मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Govinda Exit Politics – बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता ‘गोविंदा’ सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अशातच आता त्याने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. अभिनेता गोविंदाने ही माहिती एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत दिली आहे.
गोविंदाने सांगितले की, मुलगा यशवर्धन आहुजा आणि मुलगी टीना आहुजा यांच्या करिअरवर आणि भविष्यात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. राजकारणामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याने हा कठोर पण आवश्यक निर्णय घेतल्याचे सांगितले.
कुटुंबासाठीच राजकारण सोडलं…
गोविंदाने म्हटलं, “मी माझ्या फॅमिलीसाठीच राजकारणातून एक्झिट घेतली आहे. माझं सर्वाधिक लक्ष राजकारणातच होतं, त्यामुळे नकळत माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होतं. हे लक्षात आल्यानंतर मी हा निर्णय घेतला.”
तो म्हणाला, “मी निर्माता साजिद नाडियाडवालांना विनंती केली आहे की, त्यांनी माझ्या मुलाला चित्रपट निर्मितीचं ज्ञान द्यावं, अभिनयाचे धडे द्यावेत. माझ्या मुलांनी योग्य मार्गदर्शनाखाली पुढे जावं, हीच माझी इच्छा आहे.” असं देखील अभिनेता यावेळी म्हणाला आहे.
राजकारणातील प्रवास थांबवला :
गोविंदाने मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान त्याने प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तो प्रचारसभा आणि भाषणांसाठी उपस्थित राहिला होता.
#WATCH मुंबई: बेटे के करियर को सपोर्ट न करने के पत्नी के आरोपों पर अभिनेता गोविंदा ने कहा, “…मैंने अपने परिवार के लिए राजनीति छोड़ दी क्योंकि मैं नहीं चाहता था कि मेरे द्वेष किसी भी प्रकार से मेरे पारिवारिक जीवन में दखल दे, खासकर मेरे बच्चों पर… मैंने नाडियाडवाला से मेरे बेटे… pic.twitter.com/z8ZhsNoGfU
— ANI_HindiNews (@AHindinews) February 10, 2026
मात्र, राजकारणाचा परिणाम कुटुंबावर होऊ नये आणि मुलांच्या भविष्यासाठी योग्य वेळ देण्यासाठीच त्याने महाराष्ट्राच्या राजकारणातून एक्झिट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयामुळे त्याचे चाहते काहीसे आश्चर्यचकित झाले असून, अनेकांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अभिनेता गोविंदा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती :
९०च्या दशकात गोविंदा हा बॉक्स ऑफिसचा सर्वात विश्वासार्ह अभिनेता मानला जात होता. त्याची कॉमिक टाइमिंग, नृत्यशैली आणि साध्या माणसाच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.
राजकारणात फार काळ न टिकता, पुन्हा एकदा कुटुंब आणि मुलांच्या करिअरला प्राधान्य देणारा गोविंदा हा निर्णय त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे.
दि. २१ डिसेंबर १९६३ रोजी अभिनेता गोविंदाचा जन्म झाला असून, अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात १९८६ साली ‘इल्जाम’ चित्रपटातून केली आहे. गोविंदाने अनेक सुपरहिट सिनेमा दिले असून, यामध्ये कुली नं.1 , दुल्हे राजा , राजा बाबू , साजन चले ससुराल इत्यादी.. अनेक चित्रपट आहेत.
हे देखील वाचा…






