Maharashtra Politics : ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा! ‘इतके’ नगरसेवक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पडद्यामागच्या राजकारणाची चर्चा
Maharashtra Politics : अशातच आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली असून, येथील स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : सध्या एकनाथ शिंदेंकडून मोठे डाव टाकले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला खिळखिळी करण्याचा जणू चंगच शिंदेंनी बांधला आहे. अॅापरेशन टायगर २.० नंतर आता पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुंबईतील ठाकरेंच्या नगरसेवकांना फोडण्याचे संकेत दिले होते. अशातच आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली असून, येथील स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक महापालिकेत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक सध्या शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या १० ते १२ नगरसेवकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने गळ टाकला आहे. आता हे पाहणे महत्वाचे आहे की यामध्ये हे नगरसेवक कसे येतात की वेगळचं धक्का देणारे काहीतरी घडणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाच्या या नगरसेवकांना प्रभागनिहाय ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते १० ते १२ नगरसेवक मोठा निर्णय घेत ठाकरेंला धक्का देणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. समजा असे झाले तर नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठा उलटफेर होऊ शकतो.
शिंदेंच्या उपनेत्याचा मोठा दावा
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या वेळी मंत्री उदय सामंत दादा भुसे आमदार सुहास कांदे यांच्या संपर्कात अनेक पक्षाचे नगरसेवक होते, त्यातून कोणी प्रवेश करत असेल तर स्वागत आहे, हे ऑपरेशन नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आकर्षण असल्याचा मोठा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.
तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ही अनेक प्रवेश होणार असल्याचा दावा बोरस्ते यांनी केला आहे.






