Chakan : चाकणपर्यंत मेट्रो पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री पवार
Chakan : वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता चाकणला महानगरपालिकेचा दर्जा देण्याबाबतही सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली. चाकणला महानगरपालिका व्हावी, ही स्वर्गीय अजित पवार यांची इच्छा होती.

चाकण :चाकणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि औद्योगिक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चाकणपर्यंत मेट्रो पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ठोस ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
खेड तालुक्यातील अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. चाकणमधील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे आणि वाढती लोकसंख्या व औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन चाकणला महानगरपालिकेचा दर्जा द्यावा, अशी मागणी माजी आमदार दिलीप मोहितेपाटील यांनी केली. त्याचप्रमाणे नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन लवकर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या मागणीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आश्वासित केले.
वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता चाकणला महानगरपालिकेचा दर्जा देण्याबाबतही सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली. चाकणला महानगरपालिका व्हावी, ही स्वर्गीय अजित पवार यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दोन्ही घोषणांमुळे चाकणच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. चाकणमधील वाहतूक आणि नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी समन्वयाने काम करावे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन ठामपणे प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पुणे जिल्ह्यात होणार्या आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेमुळे जिल्ह्याला जागतिक ओळख मिळण्यासह पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.





