Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे भाजप सोडणार होते? नागपूरच्या ‘त्या’ दोन नेत्यांमुळे घेतला होता मोठा निर्णय; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, ते मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंडे यांनी केंद्रात मंत्रीपद देण्याची अट घातली होती, असे चव्हाण यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
“मला केंद्रात मंत्री करा, अन्यथा नागपूरचे दोन नेते मला भविष्यात निवडून येऊ देणार नाहीत,” अशी भीती गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. (Maharashtra Politics)
सोनिया गांधींची मंजुरी, मात्र मनमोहन सिंगांचा विरोध
चव्हाण यांच्या दाव्यानुसार, गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजुरी दिली होती. मात्र, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या प्रस्तावाला विरोध केला. (Maharashtra Politics)
विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन थेट केंद्रात मंत्री करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका मनमोहन सिंग यांनी घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश प्रत्यक्षात होऊ शकला नाही. (Maharashtra Politics)
‘माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक’
या संपूर्ण प्रकरणात आपण थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा न करता सोनिया गांधी यांच्याकडे गेलो, याचा आजही पश्चाताप होत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. मंत्रिमंडळाच्या निर्णयांमध्ये अंतिम अधिकार पंतप्रधानांचा असतो. त्यामुळे त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय पुढे नेणे ही आपली चूक होती, असेही चव्हाण यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यामुळे गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते का आणि त्या काळातील ‘नागपूरचे दोन नेते’ नेमके कोण होते? यावर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)






