Manoj Jarange : मनोज जरांगेची प्रकृती बिघडली; मराठा आंदोलकांची चिंता वाढली
मराठा आरक्षणाच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना मध्यरात्री तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना मध्यरात्री तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्राचा झंझावाती दौरा पूर्ण करून ते नुकतेच अंतरवाली सराटीत परतले होते. मात्र, सततचा प्रवास, जाहीर सभा, भाषणे आणि दगदगीमुळे त्यांच्या शरीरावर मोठा (Manoj Jarange) ताण आला होता.
काल रात्री जरांगे यांना १०२ अंश इतका तीव्र ताप भरला, सोबतच अंगदुखी आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने सहकाऱ्यांनी कोणतीही जोखीम न पत्करता त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवले.
सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना (Manoj Jarange) पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
सरकारवर घणाघात आणि आंदोलनाचा इशारा
हैदराबाद गॅझेट लागू होऊनही मराठा-कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नसून, दिलेली प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी सत्ताधारी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला होता. याच मुद्द्यावरून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवसीय दौरा केला.
या दौऱ्यातील सभांमधून त्यांनी महसूल मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार राजकीय निशाणा साधला होता. मराठवाड्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने आधीच राजकीय वातावरण तापले आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या २९ ऑगस्टपासून जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी उपोषणाची हाक दिली आहे. आगामी आंदोलन अधिक आक्रमक करण्याच्या तयारीत असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने मराठा आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.






