Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा उलटफेर? मुंबई शहराध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर; चर्चांना उधाण
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत संघटनात्मक रचनेत मोठ्या बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात नेतृत्वाच्या पातळीवर बदल होत असतानाच आता पक्षाच्या मुंबईतील संघटनात्मक रचनेतही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. (Maharashtra Politics)
पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत पार्थ पवार लक्ष घालत असल्याने झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबईची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचा पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील वाढता सहभागही चर्चेचा विषय ठरत आहे. (Maharashtra Politics)
झिशान सिद्दीकी कोण आहेत?
झिशान सिद्दीकी हे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Maharashtra Politics)
सध्या झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत. मे २०२६ पासून त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ सुरू झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा होती. मात्र, पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी दिली. आता त्यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Maharashtra Politics)
ठाण्यात अजित पवार गटाला धक्का
एकीकडे मुंबईतील संघटनात्मक बदलांची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे ठाण्यात अजित पवार गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांनी पक्षाला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics)
त्यांच्यासोबत सरचिटणीस हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची साथ सोडली. ठाणे शहरातील पक्ष नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत दोघांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईत संभाव्य संघटनात्मक फेरबदल आणि ठाण्यातील पक्षांतराच्या घडामोडींमुळे अजित पवार गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. (Maharashtra Politics)


