PM Modi Italy Visit: पंतप्रधान मोदींनी इटलीमध्ये घेतली जॉर्जिया मेलोनी यांची भेट ; डिनर अन् नंतर एकाच गाडीतून मारला फेरफटका
PM Modi Italy Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी इटलीमध्ये दाखल झाले आहेत.

PM Modi Italy Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी इटलीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी रोममध्ये रात्रीच्या जेवणावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी कोलोसियमला भेट दिली.
पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले, “रोममध्ये दाखल झाल्यावर मला पंतप्रधान मेलोनी यांना रात्रीच्या जेवणावेळी भेटण्याची संधी मिळाली, त्यानंतर आम्ही प्रतिष्ठित कोलोसियमला भेट दिली. आम्ही विविध विषयांवर आमची मते मांडली. आजच्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे, जिथे आम्ही भारत-इटली मैत्री अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा सुरू ठेवू.” (PM Modi Italy Visit)
Upon landing in Rome, had the opportunity to meet Prime Minister Meloni over dinner followed by a visit to the iconic Colosseum. We exchanged perspectives on a wide range of subjects. Looking forward to our talks today, where we will continue the conversation on how to boost the… pic.twitter.com/df0bDYKCdU
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2026
इटलीच्या पंतप्रधानांनीही पंतप्रधान मोदींचे स्वागत करत त्यांना “माझे मित्र” असे संबोधले. मेलोनी यांनी ऐतिहासिक कोलोसियमच्या स्टँडवरून पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले, “रोममध्ये स्वागत आहे, माझ्या मित्रा.” (PM Modi Italy Visit)
दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni )यांच्यासोबत एकत्र डिनर केला आणि त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून फेरफटका मारल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत. (PM Modi Italy Visit)
मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी इटलीमध्ये दाखल झाले, ज्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचाही समावेश होता.
Welcome to Rome, my friend! 🇮🇹🇮🇳 pic.twitter.com/mUjFL4HIqY
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) May 19, 2026
पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत आहेत आणि दोन्ही देश विविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी एक व्यापक चौकट असलेल्या ‘संयुक्त सामरिक कृती योजना २०२५-२०२९’ ला सक्रियपणे पुढे नेत आहेत. संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार होण्याची अपेक्षा आहे. (PM Modi Italy Visit)





