Giriraj Singh : राहुल गांधींकडून भारतीय सैन्याचा अपमान; भाजप नेते गिरीराज सिंह यांची टीका
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
भारत-चीन सीमेवरील वादावर लोकसभेत माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख करण्याच्या राहुल गांधींच्या प्रयत्नांवरून हा वाद उफाळून आला.
एका मुलाखतीत सिंह म्हणाले की, राहुल गांधी संसदेत आणि संसदबाहेर भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत. ते पाकिस्तान आणि चीनसारखे वागत आहेत. यावेळी गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींच्या एका स्वयंसेवी संस्थेला चिनी निधी मिळाला आहे का, असा सवालही उपस्थित केला.
लोकसभेत सभापतींच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींवर संसदीय परंपरा मोडल्याचा आरोप केला. सिंह यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान वेगळ्या विषयावर चर्चा करण्याचा आग्रह धरणे अयोग्य होते.
भारत-चीन सीमावादावर चर्चा करायची असेल, तर १९६२ च्या युद्धापासून ती व्हायला हवी. माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी २०२१ मध्ये एक इंचही जमीन गमावलेली नाही असे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.
ममता तुरुंगात असायला हव्यात
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही गिरीराज सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. कोलकात्यातील आय-पीएसी कार्यालयातून कथित मनी लाँड्रिंग प्रकरणातील पुरावे चोरीला गेल्याच्या आरोपावरून ममता बॅनर्जी तुरुंगात असायला हव्यात, असे त्यांनी म्हटले.
ईडीच्या छाप्यांनंतर पुरावे गायब होणे हा गंभीर गुन्हा असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकांबाबत बोलताना सिंह यांनी केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला आणि द्रमुक सरकारवर हिंदूंवरील अत्याचारांचे आरोप केले.
हे पण वाचा : K. Annamalai : भाजप नेते के. अन्नामलाई यांचा विधानसभा प्रभारी पदाचा राजीनामा






