घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य 63 तासांनी पूर्ण; 16 जणांचा मृत्यू, तर 75 जण जखमी

मुंबई – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य अखेर 63 तासांनी संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची शेवटची पाहाणी करत हे बाचवकार्य संपल्याची घोषणा केली.
सोमवारी सायंकाळी मुंबईत जो सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात घाटकोपर पूर्व द्रुतगती महामर्गावरील हे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी झाले होते.
जखमींवर नजीकच्या रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली. या दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी पालिकेने व्हिजेटिआयची मदत मागितली.
या घटनेची सारी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने आधीच यातून अंग काढून घेतले आहे. तर ज्या इगो मीडियाकडे या होर्डिंगचे कंत्राट होते त्याचा मालक भावेश भिंडेचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत.





