Gautam Gambhir Post : पंतप्रधानांनंतर गंभीरचेच सर्वात कठीण काम!” शशी थरूर यांच्या पोस्टवर ‘गोती’चा ट्रोलर्सना सडेतोड रिप्लाय
Gautam Gambhir Post : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती, ज्यावर गौतम गंभीरने प्रतिक्रिया देताना टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

Gautam Gambhir Post for Shashi Tharoor : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील नागपूर टी-२० सामन्यादरम्यान मैदानावर खेळाडूंच्या कामगिरीसोबतच मंचावरील एका भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भेट घेतली. या भेटीनंतर थरूर यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट आणि त्यावर गंभीरने दिलेले उत्तर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
पंतप्रधानांनंतरचे सर्वात कठीण काम!
शशी थरूर यांनी गौतम गंभीरसोबतचा फोटो ‘X’ (ट्विटर) वर शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, “पंतप्रधानांनंतर भारतातील सर्वात कठीण काम जर कोणी करत असेल, तर तो गौतम गंभीर आहे. तो खंबीरपणे टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे.”
गंभीरवर सातत्याने होणाऱ्या टीकेचा संदर्भ देत थरूर पुढे म्हणाले, “दररोज लाखो लोक त्याच्या निर्णयावर चर्चा करत असतात, तरीही तो शांत राहून निर्धाराने पुढे जात आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये नक्कीच यश मिळवेल.”
टीकाकारांना गंभीरचा ‘थेट’ टोला –
Thanks a lot Dr @ShashiTharoor! When the dust settles, truth & logic about a coach’s supposedly “unlimited authority” will become clear. Till then I’m amused at being pitted against my own who are the very best! https://t.co/SDNzLt73v5
— Gautam Gambhir (@GautamGambhir) January 21, 2026
शशी थरूर यांच्या या कौतुकास्पद पोस्टवर गौतम गंभीरनेही आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. गंभीरने लिहिले, “खूप खूप धन्यवाद डॉ. शशी थरूर! जेव्हा हे सर्व प्रकरण (गोंधळ) शांत होईल, तेव्हा प्रशिक्षकाच्या तथाकथित ‘अमर्याद अधिकारां’बद्दलचे सत्य आणि तर्क सर्वांना स्पष्ट होईल. तोपर्यंत, जे स्वतः सर्वोत्तम आहेत अशा माझ्याच लोकांशी मला स्पर्धेत उभे केले जातेय, हे पाहून मला फक्त गंमत वाटतेय!”
गौतम गंभीरची शशी थरुर यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया
गंभीरच्या या उत्तराचा रोख त्या टीकाकारांकडे आहे, जे सातत्याने त्याच्याकडे संघ निवडीचे किंवा प्रशिक्षणाचे ‘अमर्याद अधिकार’ असल्याचा दावा करून त्याला ट्रोल करत असतात.
नागपुरात चर्चा फक्त ‘गुरु-शिष्यांची’ –
नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवला असला तरी, स्टँड्समध्ये बसलेले शशी थरूर आणि डगआऊटमध्ये बसलेला गौतम गंभीर यांच्यातील हा संवाद क्रीडा आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.





