Gautam Gambhir PC : कोच गंभीरने दिले मोठे संकेत! ‘या’ खेळाडूला मिळणार तिसऱ्या क्रमांकावर संधी; ऋषभ पंतबाबतही केला खुलासा
Gautam Gambhir PC : शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्लेइंग इलेव्हन आणि संघाच्या रणनीतीबाबत अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.

Gautam Gambhir PC IND vs AFG Test : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना शनिवार, ६ जूनपासून सुरू होत आहे. हा सामना डब्ल्यूटीसीचा भाग नसला, तरी आगामी मोठ्या मालिकांच्या दृष्टीने संघ व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक सामन्याच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir ) यांनी प्लेइंग इलेव्हन आणि संघाच्या रणनीतीबाबत अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
देवदत्त पडिक्कलऐवजी साई सुदर्शनला मिळणार प्राधान्य! (Gautam Gambhir PC)
गौतम गंभीर (Gautam Gambhir ) यांनी स्पष्ट केले की, डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याला कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीत देवदत्त पडिक्कलऐवजी साई सुदर्शनला अंतिम ११ मध्ये प्राधान्य दिले जाईल.
गौतम गंभीर म्हणाले, “साई सुदर्शनला अजून योग्य संधी मिळालेली नाही. त्याने त्याचे बहुतांश सामने इंग्लंडमध्ये खेळले आहेत. तो सध्या खराब फॉर्ममध्ये नाही, त्याने आयपीएल २०२६ मध्ये ७०० हून अधिक धावा कुटल्या आहेत. जर आपण केवळ ४-५ सामन्यांच्या आधारे साईचे मूल्यमापन केले, तर ते चुकीचे ठरेल. त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूर्ण संधी मिळायला हवी.” ( Gautam Gambhir PC)
🚨 Gautam Gambhir warned Rishabh Pant to bat according to the situation:
Rishabh Pant has been one of India’s best Test batters over the last 5–6 years and has played many match-winning knocks single-handedly with his attacking approach.
But now, after failing in just two Test… pic.twitter.com/G37y0OBELe
— Indian Cricket Ministry (@ICM_News45) June 5, 2026
श्रीलंका दौऱ्यासाठी ४ स्पिनर्सची तयारी; मानव की हर्ष? (Gautam Gambhir PC)
🚨 GAUTAM GAMBHIR MASSIVE STATEMENT ON RISHABH PANT SAI SUDHARSHAN AND NEW JOIN BIWLERS 🚨
– Sai hasn’t received a consistent run of opportunities in the past, but we are committed to giving him an extended run in the team.
– We have the ability, belief, and strategic approach… pic.twitter.com/MLVmzAFZF1— Cricket Central (@CricketCentrl) June 5, 2026
ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया चार फिरकीपटू (स्पिनर्स) तयार करत असल्याचे गंभीर यांनी सांगितले. या सामन्यात डावखुऱ्या फिरकीपटूच्या एका जागेसाठी मानव सुथार आणि हर्ष दुबे यांच्यात चुरस आहे. यावर बोलताना गंभीर म्हणाले, “मानव आणि हर्ष यांच्या गोलंदाजीच्या शैलीत थोडा फरक आहे. या सामन्यामुळे आम्हाला आमचा चौथा फिरकीपटू तयार करण्यास मदत होईल, कारण श्रीलंका दौऱ्यावर आम्ही चार स्पिनर्स घेऊन जाणार आहोत. न्यूझीलंड दौऱ्यासाठी आमची तयारी वेगळी असेल.” (Gautam Gambhir PC)
ऋषभचे उपकर्णधारपद का गेले? (Gautam Gambhir PC)
कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून ऋषभ पंतला हटवण्याबाबत विचारले असता, गौतम गंभीर यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली. गंभीर म्हणाले, “ऋषभ पंतला माझा पूर्ण पाठिंबा आहे, पण त्याला सामन्याची परिस्थिती आणि वेळेचे गांभीर्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे. आम्हाला ऋषभच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीत कोणताही बदल करायचा नाही, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना खेळाडूंनी खेळपट्टी आणि सामन्याच्या परिस्थितीचा आदर करणे अत्यंत आवश्यक असते.”





