KL Rahul Unsold : क्रिकेट विश्वात खळबळ! आयपीएलमध्ये ५९३ धावा कुटणारा केएल राहुल ‘या’ टी-२० लीगमध्ये राहिला ‘अनसोल्ड’
KL Rahul Unsold : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

KL Rahul Unsold In Maharaja Trophy KSCA T20 League : आयपीएल २०२६ (IPL2026) च्या १९ व्या हंगामात दिल्ली खेळताना ५९३ धावा कुटणारा स्टार फलंदाज केएल राहुलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. टी-२० फॉरमॅटमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या केएल राहुलला कर्नाटक राज्य क्रिकेट संघातर्फे (KSCA) आयोजित केल्या जाणाऱ्या ‘महाराजा ट्रॉफी टी-२० लीग’च्या आगामी हंगामासाठी कोणत्याही संघाने खरेदी केलेले नाही. ऑक्शन प्रक्रियेत केएल राहुल पूर्णपणे ‘अनसोल्ड’ राहिल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (KL Rahul Unsold)
केवळ २ लाखांची बेस प्राईस, तरीही संघांनी फिरवली पाठ! (KL Rahul Unsold)
केएल राहुलने (K.L. Rahul) या लिलावासाठी स्वतःला अवघ्या २ लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये (मूलभूत किंमत) रजिस्टर केले होते. इतका मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू एवढ्या कमी किमतीत उपलब्ध असतानाही, लिलावात एकाही संघाने त्याच्यावर बोली लावण्यात स्वारस्य दाखवले नाही. परंतु, राहुल अनसोल्ड राहण्यामागे त्याचा फॉर्म नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे व्यस्त वेळापत्रक हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे.
KL Rahul has gone unsold in the Maharaja T20 league.😭
Rishabh Pant was not available in DPL still he is getting bid in the last 2 auctions.
Ishan was not available everyone knows still he got bid in UKPL
pic.twitter.com/zZfwnOmt4W— Drona (@drona_17) June 5, 2026
महाराजा ट्रॉफीचा आगामी हंगाम २० जूनपासून सुरू होणार असून १२ जुलै रोजी याचा अंतिम सामना खेळवला जाईल. या काळात केएल राहुल भारतीय संघासोबत व्यस्त असणार आहे. तो सध्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या मुख्य संघाचा भाग आहे. या मालिकेनंतर त्याला विश्रांती दिली जाणार असली, तरी आगामी इंग्लंड दौऱ्यावरील महत्त्वाच्या वनडे मालिकेसाठी तो स्वतःच्या वर्कलोडवर लक्ष केंद्रित करणार आहे. कमी सामन्यांमधील उपलब्धतेच्या याच कारणामुळे फ्रँचायझींनी त्याच्यावर बोली लावणे टाळले. (KL Rahul Unsold)
मनीष पांडे, करुण नायरवर लाखोंची बरसात (KL Rahul Unsold)
केएल राहुल अनसोल्ड राहिला असताना, आयपीएल २०२६ मध्ये फारशा संधी न मिळालेल्या कर्नाटकच्या इतर सिनियर खेळाडूंवर मात्र ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडला. अनुभवी फलंदाज करुण नायरला ‘मंगळुरू ड्रॅगन्स’ने तब्बल १८ लाख रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात सामील केले. तर मनीष पांडेला ‘गुलबर्ग मिस्टिक’ने १२.७५ लाख रुपयांना खरेदी केले. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याला २.६ लाख रुपयांत ‘मैसूर वॉरियर्स’ने संघात घेतले. विशेष म्हणजे, आयपीएल २०२६ चा किताब जिंकणाऱ्या आरसीबी संघाचा भाग असलेल्या देवदत्त पडिक्कलला ‘मैसूर वॉरियर्स’ने अवघ्या २.६ लाख रुपयांच्या किरकोळ किमतीत आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे.





