Ganeshotsav 2023: पुणे महापालिकेचे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक विसर्जन मिरवणुकीला बंदोबस्तात

Updated On:

पुण्यासह आज राज्यभरात गणपती विसर्जनाची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून ढोल-ताशांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला आहे. गणपती मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदा पुण्यात पोलिस बंदोबस्तात तृतीयपंथी पोलीसांचाही समावेश करण्यात आला आहे. अलका चौकात पहिल्यांदा यावेळी तृतीयपंथी पोलीस महिलांचाही पोलिस बंदोबस्तात समावेश करण्यात आल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच लोकांकडून  देखील बंदोबस्तात तृतीयपंथी पोलीस महिलांना चांगली वागणूक मिळत असल्याने त्यांच्याकडून समाधान देखील व्यक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिकाकडून आपल्या यंत्रणेत काही तृतीयपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक देखील करण्यात आले होते. त्यानंतर आता या तृतीयपंथी पोलीस महिलांचाही पोलिस बंदोबस्तात समावेश केल्याने सध्या ते अधिक चर्चेत आले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर