पुणे जिल्हा | तरडोली येथे दशक्रिया घाट सुशोभीकरणासाठी निधी मंजूर

मोरगाव, (वार्ताहर) – बारामती तालुक्यातील तरडोली येथे गेल्या अनेक वर्षापासून दशक्रिया घाटाची मागणी होती. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून येथे दशक्रिया घाट सुशोभीकरण निधी मंजूर झाला. या कामाचे भूमीपूजन सरपंच अनिता पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुवार, दि. २६ रोजी तरडोली (ता. बारामती) धीरज भापकर वस्ती ते वडाचा मळा रस्ता, गावठाणातील दशक्रिया विधी गट सुशोभीकरण, सटवाई मंदिर सभा मंडप, भोईटेवाडी मळा रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन सरपंच अनिता उत्तम पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
अनेक वर्षापासून दशक्रीया घाटावर विधीप्रसंगी लोकांना ऊन वारा पावसाचा सामना करावा लागत होता. घाटाच्या सुशोभीकरणासह इतर कामांचे भूमीपूजन आज सरपंच अनिता उत्तम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सागर जाधव, तसेच सोमेश्वर कारखाना संचालक किसन तांबे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र तांबे, स्वाती गायकवाड, अश्विनी गाडे, विद्या भापकर, माजी उपसरपंच संजय पाटील,
निवृत्त सैनिक सतीश गायकवाड, हनुमंत भापकर, ठेकेदार काका तावरे, ग्रामसेवक रूपाली मेहेत्रे, पोलीस पाटील बाळासाहेब जाधव, सतीश भापकर,विनायक गाडे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सटवाई मंदिर गावातील पुरातन मंदिरापैकी एक असून या मंदिरासमोर सभामंडप होणार असल्याने येथे यात्रा उत्सव सुरळीत पार पाडता येणार आहे. यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सूत्रसंचालन सागर जाधव यांनी केले.





