मोठी बातमी..! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलवर निर्बंध; आता फक्त ‘इतक्या’ रुपयांचं पेट्रोल मिळणार
Petrol Restriction : इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर आणि नाशिकमध्ये पेट्रोल विक्रीवर मर्यादा आणल्या आहेत.

Petrol Restriction : कोल्हापूर जिल्ह्यात इंधन वितरणावर मोठे निर्बंध लागू करण्यात आले असून, नागरिकांना आता ठरावीक मर्यादेतच पेट्रोल मिळणार आहे. जागतिक पातळीवरील तणाव आणि कच्च्या तेलाच्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
इराण-इस्रायल संघर्षामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होत असून, भविष्यातील तुटवडा टाळण्यासाठी २५ मार्च २०२६ पासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.
नवीन नियमावलीनुसार
दुचाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त 200 पर्यंतच पेट्रोल मिळणार
तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी ही मर्यादा 2000 पर्यंत
कॅन, बाटली किंवा ड्रममध्ये पेट्रोल देण्यास पूर्ण बंदी
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधन साठा योग्य पद्धतीने वापरला जावा आणि अत्यावश्यक सेवांना पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २५ ते ३१ मार्चदरम्यान साठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, आदेश जाहीर होताच जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेकांनी टाकी फुल करण्यासाठी गर्दी केली. मात्र प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





