Nagar | ढूस वस्तीवर दोन बिबट्याचा मुक्त संचार
Updated On:

राहुरी, (प्रतिनिधी): तालुक्यामध्ये असलेल्या देवळाली प्रवरा येथील ढूस वस्तीवर दोन बिबट्यांचा मुक्त संचार आढळून आला. दोन बिबट्यांच्या जोडीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
बुधवारी रात्री बाराच्या सुमारास वैभव ढूस यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बिबट्यांच्या जोडीचा जवळून व्हिडिओ बनविला आहे. या दोन बिबट्यांना मुक्त संचार करताना पाहून शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आप्पासाहेब ढूस यांनी केली आहे. बिबट्याच्या मुक्त संचारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे समोर आल्याचे आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले.





