Nagar : विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू
Updated On:

राहुरी : तालुक्यातील तांभेरे येथे चुलतीला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्याचा विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. कुणाल अशोक कांबळे हा युवक विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यूमुखी पडला.
त्याची चुलती भारती कांबळे या संध्याकाळी घराजवळ पाणी भरत असताना जवळच्या लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये विजेचा करंट उतरलेला होता. त्या धक्का बसल्याने ओरडल्याने कुणालने चुलतीस बाजूला ओढले.
मात्र, त्यांना वाचण्यासाठी गेलेला कुणाल अशोक कांबळे चिकटून बसल्याने जागीच मृत्यू झाला. भारती कांबळे यांच्यावर राहुरी फॅक्टरी येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शोकाकूल वातावरणात कुणालवर अंत्यसंस्कार करण्यात आले.





