Jacob Martin Arrest : माजी भारतीय क्रिकेटपटूला अटक! मध्यरात्री दारूच्या नशेत कार चालवून वाहनांना उडवलं, वडोदरातील घटना
Jacob Martin Arrest : भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनला मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुजरातच्या वडोदरा पोलिसांनी अटक केली आहे.

Jacob Martin arrested for drunk driving Vadodara : भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेकब मार्टिन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुजरातच्या वडोदरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २६ जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली असून यामुळे क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, जेकब मार्टिन हा अकोटा भागातील पुनीत नगर सोसायटीकडे आपल्या कारने जात होता. रात्री २:३० च्या सुमारास अकोटा-दांडिया बाजार पुलावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मार्टिनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताचा आवाज ऐकून नागरिक जमा झाले आणि त्यांनी अकोटा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तपासणी केली असता मार्टिन नशेत असल्याचे स्पष्ट झाले.
वाढदिवसाची पार्टी नडली!
વડોદરામાં પૂર્વ ક્રિકેટર જેકોબ માર્ટિનની ધરપકડ 26 જાન્યુઆરીએ રાત્રે ત્રણ વાહનોને મારી હતી ટક્કર!
Former Indian cricket player Jacob Martin was arrested early Tuesday morning after he reportedly crashed his SUV into three parked vehicles in Vadodara.#Vadodara #Jacobmartin pic.twitter.com/pY8ET7AWKU
— My Vadodara (@MyVadodara) January 28, 2026
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मार्टिन आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त एका मित्राच्या घरी गच्चीवर पार्टी करत होता. या पार्टीत मद्यपान केल्यानंतर तो कार चालवत घरी जात असताना हा अपघात झाला. विशेष म्हणजे, याआधीही बेकायदेशीर मद्यपान केल्याप्रकरणी मार्टिनसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
कोण आहे जेकब मार्टिन?
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या जेकब मार्टिनला अटक
जेकब मार्टिन हा १९९९ ते २००१ या काळात भारतासाठी १० एकदिवसीय (ODI) सामने खेळल आहे. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व करताना १३८ सामन्यांत ९,१९२ धावा केल्या आहे. विशेष म्हणजे १९९८-९९ च्या रणजी हंगामात १००० हून अधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. निवृत्तीनंतर तो कोचिंग आणि व्यवसायात सक्रिय होता.
जेव्हा मदतीसाठी धावले होते दिग्गज क्रिकेटपटू –
काही वर्षांपूर्वी जेकब मार्टिन एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हा त्याच्या फुफ्फुसाला आणि यकृताला मोठी इजा झाली होती. उपचारासाठी कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत असताना बीसीसीआय, बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि माजी सौरव गांगुलीसह अनेक क्रिकेटपटू त्याच्या मदतीला धावून आले होते. मात्र, आता मद्यधुंद अवस्थेत केलेल्या या कृत्यामुळे त्याच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.





