Shivalik Sharma : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूवर बलात्काराचा आरोप, जोधपूर पोलिसांनी केली अटक

Mumbai Indians Ex-Player Shivalik Sharma Arrested in Rape Case : आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्माला बलात्काराच्या आरोपाखाली जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे. जोधपूरच्या कुडी भगतसुनी पोलिस ठाण्याने कारवाई करत गुजरातमधील वडोदरा येथून क्रिकेटपटूला अटक केली. पीडितेने शिवालिक शर्मा यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.दरम्यान, जोधपूर पोलिसांनी पीडितीच्या तक्रारीवरून कारवाई करत आरोपी शिवालिक शर्माला अटक केल्याची पुष्टी केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडितीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि कलम १६४ अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिस आता पुरावे गोळा करून खटला पुढे नेत आहेत. खरं तर, २ जानेवारी २०२४ रोजी जोधपूरमधील एका युवतीने कुडी भगतसुनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी असलेल्या क्रिकेटपटू शिवालिक शर्मा (२७) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला.
डर्टी गेम, डर्टी प्लेयर!
IPL क्रिकेटर #शिवालिक_शर्मा पर दुष्कर्म का आरोप।
🎥 आरोप लगाने वाली लड़की ने कैमरे पर सुनाई अपनी आपबीती।
❌ राजस्थान में मामला दर्ज, मुम्बई इंडियंस का ऑलराउंडर खिलाड़ी अब विवादों में।#IPL #ShivalikSharma #RapeAllegations #MumbaiIndians #Controversy pic.twitter.com/5JFz3ziwjr
— Political Samosa (@PoliticalS12494) May 4, 2025
युवतीचे म्हणणे आहे की फेब्रुवारी २०२३ मध्ये वडोदरामध्ये तिची शिवालिकशी भेट झाली होती. त्यानंतर दोघांमधील संभाषण वाढले आणि नंतर त्यांच्यातील जवळीक वाढली. यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये शिवालिकचे आई-वडील जोधपूरला आले. त्यानंतर, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने साखरपुडा झाला. युवतीच्या रिपोर्टनुसार, जेव्हा शिवालिक साखरपुड्यानंतर जोधपूरला परत आला, तेव्हा त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केला तेव्हा त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तो ३ जूनपर्यंत मुलीच्या घरी राहिला आणि तिच्याशी अनेक वेळा संबंध ठेवले.
हेही वाचा – PBKS vs LSG : अर्शदीप-प्रभसिमरनच्या वादळाने केली लखनौची वाताहत, पंजाबने नोंदवला सातवा विजय
फिरायला घेऊन गेल्यानंतरही ठेवले शारीरिक संबंध –
IPL खिलाड़ी शिवालिक शर्मा गिरफ्तार#Rajasthan #RajasthanNews #IPL #MumbaiIndians #JodhpurPolice #ShivalikSharma #IPLPlayerArrested #RajasthanNews #RapeCase #CrimeNews #BreakingNews @IPL @CP_Jodhpur @PoliceRajasthan pic.twitter.com/kEKOf80ceo
— Punjab Kesari Rajasthan (@punjabkesariraj) May 5, 2025
यानंतर शिवालिक तिला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैन येथे घेऊन गेला. या ठिकाणीही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि वारंवार लग्नाचे आश्वासन दिले, असा आरोप युवतीने केला आहे. पण जून २०२३ मध्ये, जेव्हा युवती तिच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी वडोदरा येथे पोहोचली, तेव्हा शिवालिकच्या कुटुंबाने तो एक क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याला इतर ठिकाणांहूनही लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे हा साखरपुडा मोडण्यास सांगितले आणि मुलीला घराबाहेर हाकलून लावले. तिथेही तिला धक्काबुक्की आल्याचा आरोप मुलीने केला आहे.
हेही वाचा – Riyan Parag : जो मैं बोलता हूँ, वो करता हूँ…!’, दोन वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी परागने करुन दाखवली खरी
शिवालिक शर्मा कोण आहे?
शिवालिक शर्माचा शर्मा हा मूळचा बडोद्याच्या रहिवासी आहे. त्याने २०१६ मध्ये बिन्नू अंडर-१९ ट्रॉफीमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, त्याने २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफी हंगामात बडोद्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शिवालिक शर्माला २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना खरेदी केले होते. तथापि, त्याने अलिकडच्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला सोडले आहे.





