IND vs PAK : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी ICC कडून मोठी घोषणा! ‘या’ २ दिग्गजांवर सोपवली विशेष जबाबदारी
IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच ऑफिशियल्सची घोषणा केली आहे.

IND vs PAK Match Umpires and Referees : क्रिकेट विश्वात ज्या सामन्याची सर्वाधिक प्रतीक्षा असते, त्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने (ICC) आता कंबर कसली आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच ऑफिशियल्सची घोषणा केली आहे. या सामन्याच्या अंपायरिंगची धुरा जगातील सर्वात अनुभवी अंपायर्सच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
भारत-पाक सामन्याचे ‘मैदानवरचे’ अंपायर-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात तणाव आणि रोमांच टोकाचा असतो, अशा वेळी अचूक निर्णयांसाठी आयसीसीने अनुभवी जोडी निवडली आहे. ज्यामध्ये ऑन-फील्ड अंपायरची जबाबदारी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर सोपवली आहे. कुमार धर्मसेना यांनी २०१६ आणि २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्येही अंपायरिंग केली आहे. रिचर्ड इलिंगवर्थ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहेत.
२४ अंपायर्स आणि ६ मॅच रेफरींची नियुक्ती –
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या अधिकाऱ्यांची घोषणा
आयसीसीने ग्रुप स्टेजच्या सामन्यांसाठी एकूण २४ ऑन-फील्ड अंपायर आणि ६ मॅच रेफरींची निवड केली आहे. यामध्ये भारताच्या नितिन मेनन यांचाही समावेश आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मॅच ऑफिशियल्स –
Match officials for the group stage of the ICC Men’s #T20WorldCup 2026 revealed 👀
Read more 👇https://t.co/hRILLsd8Pf
— ICC (@ICC) January 30, 2026
मॅच रेफरी : डीन कॉस्कर, डेव्हिड गिल्बर्ट, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन, जवागल श्रीनाथ.
मॅच अंपायर: रोलँड ब्लॅक, ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, वेन नाईट्स, डोनोवन कोच, जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाज्स्की, केएनए पद्मनाभन, अल्लाहुद्दीन पालेकर, अहसान रझा, लेस्ली रीफर, पॉल रीफेल, लँग्टन रुसेरे, शरफुदुल्लाह इब्ने शाहिद, गाजी सोहेल, रॉड टकर, अॅलेक्स व्हार्फ, रवींद्र विमलासिरी, आसिफ याकूब.
सुपर-८ आणि नॉकआऊट फेरीसाठी अंपायर्सची निवड स्पर्धेच्या पुढील टप्प्यात केली जाणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा वर्ल्ड कप विक्रमी ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.





