Rohit Sharma : कर्णधारपद गमावल्यानंतर रोहित शर्माच्या पगारात कपात? BCCI चा काय आहे नियम? जाणून घ्या

Will Rohit Sharma salary be cut after losing captaincy : बीसीसीआयने अलीकडेच मोठा निर्णय घेत रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले असून, त्याच्या जागी युवा फलंदाज शुबमन गिलची नवा वनडे कर्णधार म्हणून निवड केली आहे. रोहितने कर्णधारपद गमावल्यानंतर त्याच्या पगारात कपात होईल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. याबद्दल जाणून घेऊया.
रोहित शर्माचा पगार किती?
बीसीसीआय आपल्या केंद्रीय करार यादीतील खेळाडूंना ग्रेड सिस्टीमद्वारे पगार देते. खेळाडूंना ग्रेड A+, ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C अशा श्रेणींमध्ये विभागले जाते. खेळाडू कर्णधार असो वा उप-कर्णधार, याचा पगारावर कोणताही परिणाम होत नाही. सध्या रोहित शर्मा ग्रेड A+ श्रेणीत आहे. या श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक 7 कोटी रुपये पगार मिळतो.
कर्णधारपद गमावल्यानंतरही रोहित ग्रेड A+ मध्येच राहणार असल्याने त्याच्या पगारात कोणताही बदल होणार नाही. सध्या रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे भारतीय संघातील खेळाडू बीसीसीआयच्या ग्रेड A+ यादीत असून, त्यांना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात.
हेही वाचा – IND vs WI : जैस्वालच्या रनआऊटवरून वाद! गिलवर ठपका की खेळाचा भाग? काय म्हणाला? पाहा VIDEO
शुबमन गिलचा पगार किती?
भारतीय संघाचा युवा फलंदाज आणि नवा वनडे कर्णधार शुहमन गिल बीसीसीआयच्या 2024-25 केंद्रीय करार यादीत ग्रेड A मध्ये आहे. या श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक 5 कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय, ग्रेड A+ खेळाडूंना 7 कोटी रुपये, ग्रेड B खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि ग्रेड C खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये पगार दिला जातो.
गिलवर कर्णधारपदाची जबाबदारी
बीसीसीआयने शुबमन गिलवर वनडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी गिलने याच वर्षी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. रोहित शर्मा आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी गिलला कर्णधारपद देण्यात आले आहे. भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गिलची कसोटी
.या मालिकेतून गिल वनडे कर्णधार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करेल. गेल्या वर्षी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा सध्या वनडे प्रकारात खेळत आहे. यापूर्वी तो भारतीय वनडे संघाचा कर्णधार होता. मात्र, आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो नियमित खेळाडू म्हणून मैदानात उतरेल.





