Iga Swiatek | पाच वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन ‘इगा स्विटेक’ महिनाभरासाठी निलंबित, समोर आलं ‘हे’ कारण…

Swiatek faces doping sanctions – पोलंडची पाच वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन इगा स्विटेक हिला बंदी घातलेल्या औषधांचे सेवन केल्याबद्दल एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले असून तिने ही शिक्षा स्वीकारली आहे. पोलंडची 23 वर्षीय स्विटेक सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आहे.
🚨 Iga Swiatek tested positive for a banned substance in August 2024 due to contaminated melatonin.
Swiatek was provisionally suspended from September 22nd to October 4th and accepted a one month suspension which will end on December 4th. pic.twitter.com/WvOipdysn5
— Tennis Channel (@TennisChannel) November 28, 2024
इगा स्विटेक ही ऑगस्टमध्ये स्पर्धेबाहेरील डोपिंग चाचणीत नापास झाली होती. आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी युनिटने त्यासंदर्भातील स्पष्टीकरण स्वीकारले की तिने अजाणतेपणे ते बंदी असलेले औषध घेतले होते.
Men’s Junior Asia Cup 2024 : भारताचा सलग दुसरा विजय, थायलंडनंतर जपानला केलं पराभूत…
टेनिसमधील डोप चाचणीत अयशस्वी होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. याआधी, जागतिक क्रमवारीत अव्वल पुरुष टेनिसपटू जॅनिक सिनर मार्चमध्ये स्टिरॉइडमुळे दोन चाचण्यांमध्ये अपयशी ठरला होता. हे संपूर्ण प्रकरण यूएस ओपन स्पर्धेपूर्वीचे आहे.





