Men’s Junior Asia Cup 2024 : भारताचा सलग दुसरा विजय, थायलंडनंतर जपानला केलं पराभूत…

Men’s Junior Asia Cup 2024 (Muscat, Oman) : – गतविजेत्या भारतीय संघाने गुरूवारी रात्री उशीरा झालेल्या पुरुष ज्युनियर आशिया करंडक हॉकी स्पर्धेतील लढतीमध्ये जपानवर 3-2 अशी मात करताना स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारताने पहिल्या लढतीमध्ये थायलंड संघाला 11-0 अशी एकतर्फी मात दिली होती.
FULL-TIME: 🏑🔥
Incredible defending by Team India to seal a 3-2 win over Japan in this nail-biting match! 🇮🇳💪The defense stood strong and made all the difference fantastic teamwork and resilience! 🙌👏 #HockeyIndia #INDvsJPN #IndiaKaGame #MensJuniorAsiaCup24
.
.
.… pic.twitter.com/7mji6c5kSW— Hockey India (@TheHockeyIndia) November 28, 2024
जपानविरुद्धच्या लढतीमध्ये भारतकाडून थोकचोम किंगसन सिंहने 12 व्या मिनिटाला, रोहितने 36 व्या मिनिटाला तर अराइजीत सिंह हुंडलने 39 व्या मिनिटाला गोल केले. जपानकडून दोन्ही गोल निओ सातोने (15व्या आणि 38व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरव्दारे केले. जपानने भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बचावफळीने शानदार कामगिरी करताना जपानला रोखून धरण्यात यश मिळविले.
Men’s Junior Asia Cup 2024 : गतविजेत्या भारताची धडाकेबाज सुरुवात, थायलंडचा 11-0 ने उडवला धुवा…
भारतासमोर शनिवारी होणाऱ्या पुढील लढतीत चायनीज तैपेईचे आव्हान असणार आहे. अ-गटात भारत आणि थायलंडसह चीनी ताइपे, जपान आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. ब- गटात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, यजमान ओमान आणि चीन यांचा समावेश आहे.





