Swiatek & Wiktorowski | इगा स्विटेक अन् प्रशिक्षक विक्टोरोव्स्की अखेर विभक्त, जाणून घ्या कारण…..

Swiatek splits with coach Wiktorowski – जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या पोलंडच्या इगा स्विटेकने प्रशिक्षक टॉमाझ विक्टोरोव्स्की यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून याची घोषणा तिने शुक्रवारी(दि.4) इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केले.
प्रशिक्षक टॉमाझ विक्टोरोव्स्की यांनी तीन वर्षांपूर्वी इगा स्विटेकचे प्रशिक्षकपड स्वीकारले होते. गेल्या तीन वर्षांच्या काळात पोलंडच्या खेळाडूने पाच पैकी चार ग्रँडस्लॅम स्पर्धाचे विजेतेपद पटकावले होते. यामुळे तिला महिला गटातून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी देखील मिळाली.
तीन वर्षांच्या काळानंतर आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांनी खूप मेहनत घेतली. मला ज्यावेळी माझ्या खेळात नवीन दृष्टीकोनाची आवश्यकता होती, त्या प्रत्त्येक वेळी त्यांनी मला मदत केली. त्यांचा अनुभव, विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक वृत्ती आणि टेनिसमधील प्रचंड ज्ञान, या गोष्टींच्या जोरावर काही महिन्यातच स्वप्नातही कल्पना केलेल्या गोष्टी आम्ही साध्य केल्या, असे स्विटेकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
China Open 2024 : विजेतेपदासाठी कोको-मूचोवा आमने-सामने, थोड्याच वेळात सुरू होणार लढत….
साल 2021 च्या हंगामाच्य शेवटी टॉमाझ विक्टोरोव्स्की यांच्या नियुक्तीनंतर इगाने जबरदस्त कामगिरी बजावली आहे. तिने कारकिर्दीत 22 पैकी 19 विजेतेपद पटकावले असून विक्टोरोव्स्की यांच्या मार्गदर्शनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक देखील जिंकले होते.





