खडकवासला प्रकल्पात साडेपाच टीएमसी पाणी

पुणे – खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये रविवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा 5.52 टीएमसी म्हणजे 19 टक्के झाला आहे. यंदा काहीसा उशिरा मान्सून दाखल झाला आहे. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून धरणांत पाऊस सुरु झाला आहे. पाऊस सुरु झाला असल्याने धरणांमध्ये हळूहळू पाणी जमा होण्यास सुरुवात झाली.
मागील आठवड्यात खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 4.16 टीएमसी होता. धरणात पाणी जमा होत असल्याने एकूण पाणीसाठा 5.52 टीएमसीवर पोहचला आहे. रविवारी दिवसभरात खडकवासला धरणात 0 मिमी, पानशेत धरणात 14 मिमी, वरसगाव धरणात 14 मिमी आणि टेमघर धरणात 15 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
धरणाचे नाव पाणीसाठा टक्के
खडकवासला 0.95 टीएमसी 48.31
पानशेत 1.95 टीएमसी 18.31
वरसगाव 2.37 टीएमसी 18.46
टेमघर 0.25 टीएमसी 6.77
एकूण 5.52 टीएमसी 18.94





