काहीतरी धमाकेदार येतंय !!! ‘बिग बॉस मराठी 6’ सुरू होणार? नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण

Bigg Boss Marathi 6 | हिंदी ‘बिग बॉस १९’चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार? याची सर्वांच उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान आता मराठी बिग बॉस लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वत्र बिग बॉस मराठीचा नवीन सीझन येणार असल्याचे बोलले जात आहे.
नुकताच ‘कलर्स मराठी’ वाहिनीने एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात “उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येतंय” असे लिहिलेले पाहायला मिळत आहे. तर व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, “सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचणार, उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येणार!” या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच नव्या पर्वाची चर्चा रंगली आहे. Bigg Boss Marathi 6 |
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’चे पाच सीझन झाले असून गेल्यावर्षी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने पाचव्या पर्वाचं होस्टिंग केले होते. ज्याला मोठी पसंती मिळाली होती. ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हण झाला आहे. सूरजला बिग बॉसमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्याचा ‘झापुक झुपूक’ चित्रपटही आला, तसेच सूरज आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. Bigg Boss Marathi 6 |
अद्याप ‘बिग बॉस मराठी 6’ या नव्या सीझनची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र समोर आलेल्या प्रोमोमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र खरंच बिग बॉस मराठी सुरू होणार आहे की दुसरा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. Bigg Boss Marathi 6 |
हेही वाचा :
गौरी गर्जे मृत्यूप्रकरणी अखेर पंकजा मुंडेंच्या पीएला अटक; मध्यरात्री पोलिस स्थानकात शरण





