शिव ठाकरे पुन्हा प्रेमात? ‘त्या’ रोमॅंटिक फोटोमुळे रंगली चर्चा

Shiv Thakre Shared Photo With Mistery Girl| ‘बिग बॉस मराठी सिझन 4’चा विजेता शिव ठाकरे सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. मराठीनंतर तो हिंदी बिग बॉसमध्ये देखील पाहायला मिळाला. बिग बॉस मराठीमध्ये असताना त्याचे वीणा जगतापसोबत अफेअर चर्चेत होते. मात्र त्यांचे नातं फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर त्याचे नाव अभिनेत्री डेझी शाहसोबत जोडले गेले. यातचआता शिव ठाकरेने मिस्ट्री गर्ससोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिव प्रेमात पडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिव ठाकरे आपल्या साधेपणाने तो नेहमी प्रेक्षकांचं मन जिंकतो. यामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. यानंतर आता त्याने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने मिस्ट्री गर्लला आपल्या मिठीत घेतलं आहे. तिच्या कपाळावर तो किस करताना दिसत आहे. फोटोत मिस्ट्री गर्लचा चेहरा लपवत त्याने हार्ट इमोजी लावला आहे. यामुळे ती मुलगी नक्की कोण आहे? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
या फोटोनंतर शिव खरंच कोणाच्या प्रेमात आहे? की हा त्याचा पब्लिसिटी स्टंट आहे अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बिग बॉस नंतर शिव छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा 11’ मध्ये पाहायला मिळाला. तसेच रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’च्या 13व्या सीझनमध्ये स्टंट करताना दिसला.
हेही वाचा :






