इतिहासकार इंद्रजित सावंतांवर गुन्हा दाखल करा; करणी सेनेची मागणी

मुंबई : इतिहासकार इंद्रजित सावंत हे आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे चुकीची माहिती पसरवतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी खान्देश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सेंगर आपल्या तक्रारीत म्हणाले की, इतिहासकार इंद्रजित सावंत हे ब्राह्मण व राजपूत यांच्याविरोधात यूट्यूब चॅनेलद्वारे चुकीची माहिती पसरवतात.
ते परदेशी लेखकांनी लिहिलेल्या इतिहासाचा दाखला देत वारंवार या दोन्ही समाजांविरोधात विधाने करतात. याद्वारे ते समाजात दुही पिकवत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा. दुसरीकडे, इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे. तर काही जणांनी त्यांना धमकीही दिली आहे. त्यामुळे कोरटकरच्या पत्नीने नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली आहे.





