Prashant Koratakar | इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. अखेर प्रशांत कोरटकरला एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्यानंतर आता त्याला सकाळी 8 वाजता कोल्हापुरात आणले आहे. थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. कोरटकरला कोल्हापूराय आणल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या विरोधातील गुन्हे आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, प्रशांत कोरटकर २५ फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याने संतापाची लाट उसळली होती. नागपूरहून फरार झाल्यानंतर तो चंद्रपूरमध्ये लपला होता. कोल्हापूर पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले असता, तो पुन्हा पसार झाला. त्यानंतर, तो दुबईत पळून गेल्याचे वृत्तही समोर आले होते. अखेर तेलंगणात त्याला अटक झाली असून, त्याला कोल्हापूरमध्ये आणले आहे. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकरविरोधात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यावरून ही कारवाई झाली. Prashant Koratakar | अटकपूर्व जामीन नामंजूर इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी २५ फेब्रुवारीला कोल्हापुरात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच जिल्हा न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला. त्याविरोधात पोलिसांनी उच्च न्यायालयात दाद मागितली व पुन्हा जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला. Prashant Koratakar | कशी करण्यात आली अटक? त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवून कोरटकरचा शोध सुरू केला होता. त्याचा मोबाईल त्याच्या पत्नीने नागपूर पोलिस ठाण्यात जमा केला होता. त्यामुळे त्याच्याकडील तपासासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न झाला. पोलिसांनी काही टोल नाक्यांवर तपासणी केली होती. येथून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही माहिती मिळाली. कोल्हापूर पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथे असताना तेथील मंचरियाल जिल्ह्यातील रेल्वेस्थानक परिसरात त्यांना कोरटकर सापडला. त्यांनी कोरटकरला ताब्यात घेऊन याची माहिती तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदविली. Prashant Koratakar | हेही वाचा: Hadapsar : सातवीत शिकणाऱ्या समर्थचा कालव्यात बुडून दुर्देवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर, तिसऱ्या दिवशी मिळाला मृतदेह