Prashant Koratkar : इंद्रजीत सावंतांना मीच फोन केला होता; प्रशांत कोरटकरांनी दिली कबुली

मुंबई : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये काढल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) तेलंगणामधून अटक करण्यात आली. यानंतर त्यांना कोल्हापूर कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर आता प्रशांत कोरटकरांनी (Prashant Koratkar) आपणचं इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
काय म्हणाला प्रशांत कोरटकर?
छत्रपती शिवरायांचा अवमान करून तो मी नव्हेच म्हणत प्रशांत कोरटकर पोलिसांपासून महिनाभर फरार होता. पोलिसांच्या ताब्यात आल्यावर मात्र तो आता पोपटासारखा बोलू लागला आहे. 24 फेब्रुवारी रोजी रात्री इंद्रजित सावंत यांना त्याने कॉल करत धमकावले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यानंतर त्याने मोबाइलचा डेटा ही डिलीट केला होता अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता.
तेलंगणातून चेन्नईला पळून जाण्याचा तयारीत असताना त्याला मंचरियाल या रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोल्हापुरात त्याला अटक करून आणल्यावर शिवप्रेमींनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. तर गेले महिनाभर राज्यभरात त्याच्या विरोधात रोष होता. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची कोठडी दिल्यानंतर त्याने आता आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे.
हे पण वाचा : Income Tax New Rule: 1 एप्रिलपासून ‘हे’ नवीन कर नियम लागू होतील, पगारदार कर्मचाऱ्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे
उद्या होणार सुनावणी
कोरटकरची (Prashant Koratkar) 28 तारखेला म्हणजे उद्या कोठडी संपणार आहे.मात्र पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नाचं भडीमार कायम ठेवला आहे.कोरटकर मात्र छातीत दुखण्याचे कारण आता पुढे करत आहे.त्यामुळे उद्याच्या सुनावणीत नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
प्रशांत कोरटकर कोण आहे?
प्रशांत कोरटकर हा मुळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी. पण मागील अनेक वर्षांपासून त्याचे वास्तव चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपुरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील जनसंवाद विद्या विभागात तासीका तत्वावर काम करतो. त्याला बड्या लोकांचे आकर्षण आणि सोशल मीडियाचे प्रचंड वेड असल्याचे दिसून येते. पोलीस अधिकाऱ्यांशी फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करायचा.





