FIH Hockey Pro League 2023/24 : कर्णधार हरमनप्रीतची शानदार हॅटट्रिक, रोमहर्षक सामन्यात भारताचा अर्जेंटिनावर विजय…

FIH Men’s Hockey Pro League 2023/24 : ऑलिम्पिकपूर्वी भारतीय हॉकी संघ फॉर्मात दिसत आहे. FIH प्रो हाॅकी लीग 2023-24 च्या युरोप टप्प्यात संघाने शानदार खेळ करताना एका रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने अर्जेंटिनावर 5-4 असा रोमहर्षक विजय नोंदवला.
Victory! The Indian hockey team triumphs over Argentina with an outstanding performance! 🔥
Goalscorers:
Monja Federico 3’
Keenan Nicolas 24’ (PC)
Marcucci Tadeo 54’
Martinez Lucas 57’Hundal Araijeet Singh 7’
Gurjant Singh 18’
Harmanpreet Singh 29’ (PC) 50’ 52’ (PS)… pic.twitter.com/Vww2qw77Dx— Hockey India (@TheHockeyIndia) May 26, 2024
हा सामना सोमवारी बेल्जियममधील अँटवर्प येथे खेळला गेला. या संघाने आक्रमक खेळ दाखवत भारताच्या ऑलिम्पिक पदकाच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. भारताकडून अरिजित सिंग हुंडल (7वे मिनिट) आणि गुरजंत सिंग (18वे मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (29व्या, 50व्या आणि 52व्या मिनिटाला) यांनी गोल केले, तर अर्जेंटिनासाठी मॉन्झा फेडेरिको, मार्टिनेझ लुकास, कीनन निकलस आणि मार्कुची ताडेओ यांनी गोल केले.
FIH Hockey Pro League 2023/24 : भारतीय पुरुष हॉकी संघ बेल्जियमविरुद्ध पराभूत…
दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघ आता आपला पुढचा सामना शनिवार, 1 जून रोजी जर्मनीविरुद्ध खेळणार आहे.





