“दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले”; ‘त्या’ पोस्टरवरुन अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा

Ambadas Danve On Eknath Shinde | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष हे स्वबळावरच निवडणूक लढवत असल्याचं दिसून येत आहे. प्रचारसभादरम्यान आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे.
सध्या सोशल मीडियावर निवडणुकीच्या प्रचाराचे एक बॅनर व्हायरल होत आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे. हे बॅनर अंबादास दानवे यांनी शेअर केले आहे.
अंबादास दानवे यांचे ट्वीट
‘काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत-गुवाहाटी-गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले… आता घ्या! कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर.. ते ही धनुष्यबाण चिन्हासह ! थोडक्यात, दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले आहेत.” “याला म्हणतात बुडाखालील अंधार !, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत-गुवाहाटी-गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले..
आता घ्या! कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर.. ते ही धनुष्यबाण चिन्हासह!
थोडक्यात, दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले आहेत.… pic.twitter.com/rwrhQdgVsi
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 27, 2025
अंबादास दानवे यांनी ही पोस्ट अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपलाही टॅग केली आहे. अंबादास दानवे यांनी या राजकीय विरोधाभासावर बोट ठेवत शिंदे गटाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, काँग्रेससोबत असल्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप करत शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केली होती. मात्र, आता त्याच काँग्रेस नेत्यांचे फोटो बॅनरवर दिसल्याने शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेले पोस्टर हे उमरगा नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ च्या उमेदवाराचे आहे. Ambadas Danve On Eknath Shinde |
येथे शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती आणि मित्र शहर विकास पॅनल नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. मात्र शिंदे आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे एकत्र फोटो यात पाहायला मिळत असल्याने ठाकरे गटाकडून निशाणा साधण्यात आला आहे. Ambadas Danve On Eknath Shinde |
हेही वाचा:





