Ambadas Danve: अंबादास दानवेंचा ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर ठेका; तरुणांच्या उत्साहाला उधाण
Ambadas Danve: दहीहंडी हा केवळ उत्सव नसून सामूहिक शक्ती आणि एकजुटीचे प्रतीक

Ambadas Danve: शहरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांनीही तरुणांसोबत ठेका धरला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने टीव्ही सेंटर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मरक्षक दहीहंडी’ कार्यक्रमात दानवे यांनी ‘मैं हूँ डॉन’, ‘एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों’ आणि ‘किसमें कितना है दम, मटकी फोडे’ या गाण्यांवर डान्स केला.
दानवे यांचा डान्स पाहून उपस्थित तरुणांनीही मोठा जल्लोष केला. यावेळी दानवे यांनी दहीहंडी हा केवळ उत्सव नसून सामूहिक शक्ती आणि एकजुटीचे प्रतीक असल्याचे सांगितले.
श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सामुदायिक शक्तीचा संदेश दिला. त्याचप्रमाणे दहीहंडीच्या माध्यमातूनही एकजुटीची ताकद दिसून येते, असे ते म्हणाले.
Pimpri Chinchwad News : महापारेषण कंपनीच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग





