FDA Raid Pune: एफडीएचा पुण्यात सर्जिकल स्ट्राईक! ‘या’ प्रसिद्ध बेकरी आणि हॉटेल्सचे परवाने रद्द; पाहा पूर्ण यादी
FDA Raid Pune: अन्न व औषध प्रशासनाची (FDA) पुणे विभागात मोठी कारवाई; अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांमुळे १२ आस्थापनांचे परवाने निलंबित.

FDA Raid Pune – अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींची तपासणी करून मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचे आढळून आल्याने १२ आस्थापनांचे परवाने व नोंदणी तत्काळ निलंबित करण्यात आली आहेत.
तसेच, दीड लाखांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे विभागात १ ते ९ ऑगस्टदरम्यान १९ आस्थापनांची तपासणी करून ४१ लाख ३८ हजार ६६७ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. पुणे शहर, सांगली आणि मिरज परिसरातील विविध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून २४ व्यक्तींना अटक करण्यात आली. या कारवाईत १४ अन्न आस्थापने सील करण्यात आले असून, चार वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. याच मोहिमेत १० ऑगस्ट रोजी कोंढवा येथील कारवाईत एका वाहनातून मावा स्विटची विनाअन्न परवाना विक्री होत असल्याचे आढळून आले.
वाहनामध्ये तापमान नियंत्रणाची सोय नसल्याने आरोग्यास घातक वातावरणात मावा स्विटची वाहतूक होत असल्याचेही निदर्शनास आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल,
रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नपदार्थांचा दर्जा राखणे आणि वैध परवान्याशिवाय व्यवसाय न करणे, तसेच वापरलेले तेल पुन्हा वापरू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
या आस्थापनांवर कारवाई –
– द लोटस रिसॉर्ट, मोरावे, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे
– द मसल फूड्स (बेकरी), बिबवेवाडी, पुणे
– हुमा बेकरी, गणेशनगर, पिंपरी चिंचवड, पुणे
– न्यू महाराष्ट्र बेकर्स, दत्तनगर रोड, आंबेगाव बुद्रुक, पुणे
– माराकेश व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, पर्वती, सहकारनगर, पुणे
– स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड, वारजे जकात नाका, कर्वेनगर, पुणे






