Sadabhau Khot | राज्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. सोलापूर, धारशिव, बीड जिल्ह्यात पुराच्या पाण्याने सर्व उधवस्त केले आहे. घरात, शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतकरी, सामान्य माणसाचे मोठे झाले आहे. संपूर्ण संसार उघड्यावर आल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु आहेत. ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पुरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. याशिवाय अनेक मंत्री आमदार आणि विरोधक देखील शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले आहेत. पाहणी दौऱ्यासाठी पोहचले अन् माघारी फिरले नुकतेच आमदार सदाभाऊ खोत सोलापूरच्या उंदरगावमध्ये पाहणी दौऱ्यासाठी पोहचले. मात्र येथील ग्रामस्थ त्यांच्यावर चांगलेच आक्रमक झालेले दिसले. 8 दिवस कुठे होतात, इतके दिवस का फिरकला नाहीत?, सोळा वर्षांनी माढा तालुक्यात फिरायला आले का? असे सवाल गावात आलेल्या सदाभाऊ खोता यांना गावकऱ्यांनी केला. दरम्यान, 2009 साली सदाभाऊ खोत यांनी माढा लोकसभा निवडणूक होतील लढवली होती. Sadabhau Khot | मुख्यमंत्र्यांचा दौरा काही दिवसांपूर्वी झाला, त्यानंतर आज सदाभाऊ खोत यांचा या भागात दौरा होता. मात्र ते म्हाडा तालुक्यातील उंदरगावमध्ये पोहोचताच काही वेळातच शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. त्यांच्या रोषामुळे सदाभाऊ खोत यांना दौरा तसाच सोडून तिथून निघावं लागलं. Sadabhau Khot | हेही वाचा: Hair Straightener Side Effects: रोज रोज हेअर स्ट्रेटनरचा वापर करणे धोकादायक, जाणून घ्या नुकसान