Sadabhau Khot : “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर तुमच्या….”; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, नवा वाद उफाळण्याची शक्यता

Sadabhau Khot : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात गोरक्षकांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष्य आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते. यावेळी भाषणात गोरक्षकांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाला घेऊन नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
माझ्या नादी लागू नका मी सोबत नांगरचा फळा आणला आहे. तो नांगराचा फाळ तुमच्या xxx मध्ये घालीन, अशी थेट धमकी त्यांनी दिली आहे. त्यांना गोररक्षकांकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी हे विधान केलं आहे. आता त्यांच्या या विधानाला घेऊन त्यांच्यावर टीकाही केली जात आहे.
नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?
आजवर शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची विक्री केली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे. असे असताना काही लोकं गाया अडवतात मी त्याला विरोध केला तर मला धमकीचे फोन येऊ लागले आहेत, असं खोत म्हणाले. यावेळी पुढे बोलताना त्यांनी धमकी देणाऱ्यांना थेट इशारा देत माझ्या नादाला लागू नका मी सोबत नांगराचा फाळ आणलेला आहे, तो नांगराचा फाळ तुमच्या xxxमध्ये घालीन, असं म्हणाले.
लई गडी भेंडाळले, माझ्या नादाला लागला तर असं म्हणत सांगोल्यामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, धमकी देणाऱ्या गोरक्षकांना त्यांनी यावेळी इशारा दिला आहे.#sadabhaukhot #sangola #gorakshak pic.twitter.com/cGiiD3Ejc8
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 22, 2025
नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
सांगोल्यामध्ये जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या. या धमक्यांना त्यांनी थेट गावरान भाषेत उत्तर दिलं. पण बोलताना त्यांची जीभ घसरली. यामुळे सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा : “शेल्टर होम नाही, नसबंदीच योग्य उपाय…” ; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय





