Sadabhau Khot: ‘देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य..’; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य चर्चेत !

Sadabhau Khot | Devendra Fadnavis | राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीतील तीनपैकी एका उमेदवाराचा पराभव झाला. शरद पवार गटाने पुरस्कृत केलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा काल पराभव झाला. त्यामुळे महायुतीने महाविकास आघाडीला चांगला धक्का दिला.
या निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत विजयी झाले असून, त्यांना 26 मते मिळाली आहेत. सदाभाऊ खोत यांनी मागील वेळी विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील, असा विश्वासही सदाभाऊंनी त्यावेळी व्यक्त केला होता.
मात्र, आता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणातला धुरंदर आणि चाणक्य असल्याचे स्वतः खोत यांनी म्हंटलं आहे. त्या माणसाला प्रस्थापितांनी अनेक वेळा घेरण्याचा प्रयत्न केला. पण त्या माणसाचा आम्ही अभिमन्यू होऊ दिला नाही आणि भविष्यात देखील होऊ देणार नाही असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले.
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष आहे. त्यांनी एका गावगड्यात काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली आणि मी जिंकून आलो असेही खोत म्हणाले. आमच्या नऊच्या नऊ जागा जिंकून आल्या. जनतेला बरे वाईट कळते. चांगले निर्णय सरकारने घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत. त्यामुळं जनता फार खुश असल्याचे खोत म्हणाले.
हिंदू संस्कृतीत कोणतेही काम करायचे असेल तर श्री गणेशाचे दर्शन घेऊन काम करायचे असते, म्हणून आज सकाळी मी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्याला साकडे घातले की यावर्षी चांगला पाऊस पडू दे !
यावर्षी धन धान्याची रास उभी राहू दे आणि पिकाला सोन्याचा भाव मिळू दे असे साकडे घातल्याचे खोत म्हणाले. पडक्या घराचे कोणी मालक होत नाही. त्यामुळं लक्षात आले त्या वाड्यातल्या लोकांना, की इथे चांगला निवारा मिळू शकतो म्हणून ते इथे आल्याचे खोत म्हणाले.
हा विजयी गुलाल शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण..
हा विजयी गुलाल शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण ..
आता पर्यंत ज्या प्रकारे मी जिद्दीने शेतकऱ्याच्या प्रश्नांवर लढत शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे. यापुढे मी यापेक्षा दुपट्ट जिद्दीने यापुढे काम करून शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. pic.twitter.com/DyioTnr8ID— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 13, 2024
सदाभाऊ खोत ट्विटमध्ये म्हणाले, आता पर्यंत ज्या प्रकारे मी जिद्दीने शेतकऱ्याच्या प्रश्नांवर लढत शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे. यापुढे मी यापेक्षा दुपट्ट जिद्दीने यापुढे काम करून शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. असं ते म्हणाले आहेत.





