पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा कायम राखत मानाचे पाच तसेच प्रमुख मंडळांकडून यंदाही पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेकडून नदीकाठावर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या हौदांमध्ये श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.
महापालिका प्रशासनाने याबाबत सर्व प्रमुख मंडळांची बैठक घेत या विसर्जन तयारीचा आढावा घेत त्याची माहिती देण्यात आली होती. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात करण्यात आल्याचे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
हे विसर्जन मांडव आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार असून, या ठिकाणी रांगोळ्या फुलांची सजावट करण्यात येणार आहे. शिवाय या विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच मूर्ती विसर्जन होईपर्यंत महापालिकेचे कर्मचारीही तैनात असणार आहेत.
कुठे होणार मानाच्या गणपतींचे विसर्जन
– पतंगा गणपती विसर्जन घाट
१. कसबा गणपती
२.. तांबडी जोगेश्वरी
३. गुरुजी तालीम
– पांचाळेश्वर मंदिर गणपती विसर्जन घाट
४. तुळशीबाग
५. केसरीवाडा
६. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
७. शारदा गणपती, मंडई