Fan Fight Video : सामना मैदानावर अन् राडा स्टँड्समध्ये! लखनौच्या स्टेडियममध्ये चाहते भिडले; हाणामारीचा VIDEO व्हायरल
Fan Fight Video : राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये स्टँड्समध्ये बसलेले चाहतेच आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले.

Ekana Stadium Fan Fight Video IPL 2026 : लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर बुधवारी आयपीएल २०२६ ( IPL2026) चा ३२ वा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सवर ४० धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. मात्र, मैदानावरील खेळापेक्षा स्टेडियममधील प्रेक्षकांमधील हाणामारीची चर्चा सध्या जास्त रंगली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? (Fan Fight Video)
राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये स्टँड्समध्ये बसलेले चाहतेच आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीतच लात-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून क्रिकेटप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
A fight between two fans at the Ekana Stadium. pic.twitter.com/fRHAGdFAZ2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 23, 2026
मैदानात राजस्थानचा ‘राज’ –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात डळमळीत झाली होती. ३२ धावांत यशस्वी जयस्वाल (२२), ध्रुव जुरेल (०) आणि वैभव सूर्यवंशी (८) बाद झाले. मात्र, कर्णधार रियान पराग (२०), शिमरॉन हेटमायर (२२) आणि डोनोवन फरेरा (२०) यांच्या छोट्या योगदानानंतर रवींद्र जडेजाच्या नाबाद ४३ धावांच्या उपयुक्त खेळीमुळे राजस्थानने १५९ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ १८ षटकांत ११९ धावांवर ढेपाळला आणि त्यांना सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. Fan Fight Video
मारामारीची ही दुसरी वेळ! (Fan Fight Video)
विशेष म्हणजे, एकाना स्टेडियममध्ये प्रेक्षकांमधील हाणामारीची ही या हंगामातील दुसरी वेळ आहे. काही दिवसांपूर्वी लखनौ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यातही चाहत्यांच्या दोन गटांत हिंसक झडप झाली होती. पोलीस मध्यस्थी करत असतानाही प्रेक्षक शांत होत नसल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मैदानावर चुरशीची लढत सुरू असताना स्टँड्समध्ये होणाऱ्या अशा प्रकारांमुळे स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.





