नवी दिल्ली – देशाचे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
साधारणपणे ऍटर्नी जनरलची मुदत तीन वर्षांसाठी असते. त्यांची पहिली टर्म मागच्याच वर्षीै संपणार होती. पण त्यांना त्यावेळी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांचे वय लक्षात घेऊन सरकारने त्यांना त्यावेळी तीन वर्षांची मुदतवाढ दिली नव्हती.
ते सध्या 90 वर्षांचे आहेत. पण ते सध्या ज्या हायप्रोफाईल केसेस हाताळत आहेत त्या पाहता त्यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
1 जुलै 2017 रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांना मुदतवाढ देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे त्याचा आदेश लवकरच निघणार आहे.