अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद, रोहित पवारांनी संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मागणी

Rohit Pawar | राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संशय व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.” Rohit Pawar |
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026
“एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी,” असे आवाहनही रोहित पवार यांनी पोस्ट द्वारे केले आहे. Rohit Pawar |
हेही वाचा:
मोठी बातमी! ज्या वॅार्डात मनसेचा उमेदवार त्याच ठिकाणी पहिला दुबार मतदार सापडला, मुंबईत काय घडलं?





