Epstein Files | अमेरिकेतील ‘हाऊस डेमॉक्रॅट्स’ने लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील अनेक फोटो समोर आले आहेत. यात जगातील काही बड्या लोकांची नावे आहेत. या फाइलमधील गोष्टी बाहेर आल्याने धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. यातच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. अमेरिकी जस्टिस डिपार्टमेंटने जेफ्री एपस्टीन यांच्या चौकशीशी संबंधित 3 लाख कागदपत्र शुक्रवारी रात्री सार्वजनिक केली. या फायलींमध्ये 3500 हून अधिक फायली आहेत. समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अभिनेता ख्रिस टकर, पॉप गायक मायकल जॅक्सन आणि ब्रिटिश राजकुमार अँड्रयू यांसारख्या प्रमुख व्यक्तींचे खळबळ उडवणारे फोटो आले. याशिवाय पॉप गायक मायकल जॅक्सनचे फोटो पुढे आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये बिल क्लिंटन यांनी मायकल जॅक्सनच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो आहे. त्याचवेळी सुप्रीम्स समूहाची सिंगर डायना रॉस उजव्या बाजूला उभी आहे. काही फोटोंमध्ये क्लिंटन मुलींसोबत पूलमध्ये आंघोळ करताना आणि पार्टी करताना दिसत आहेत. 1990 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला जेफ्री एप्स्टीन आणि ट्रम्प यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र आतापर्यंत बाहेर आलेल्या फोटोंमध्ये ट्रम्प यांचा उल्लेख नसल्याचे दिसत आहे. Epstein Files | अद्याप तरी भारतातील नेत्यांची माहिती समोर नाही दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाइल्स पुढे आल्यानंतर देशातील राजकारणात मोठे बदल होतील आणि एक मराठी व्यक्ती पंतप्रधान पदावर बसू शकतो, असा दावा केला. मात्र, सध्यातरी या कागदपत्रांमध्ये किंवा फोटोमध्ये भारतातील नेत्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु या फाइलमधून पुढे आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 नोव्हेंबर रोजी कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर एपस्टीनशी संबंधित सर्व कागदपत्रे 30 दिवसांच्या आत प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आलेत. Epstein Files | हेही वाचा: Zeenat Aman: जीनत अमानने शेअर केले हेलेन आणि बादशाहसोबतचे खास फोटो; चाहत्यांना विचारला खास प्रश्न