PAK VS ENG : इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी Playing XI ची केली घोषणा, बेन स्टोक्स ‘या’ कारणामुळे संघाबाहेर…

England Tour of Pakistan :- पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने शनिवारी(दि.05) प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे.
इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. 33 वर्षीय क्रिकेटपटूने शनिवारी मुलतानमधील सराव सत्रानंतर सांगितले की, “तो दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही. 2 महिन्यांपूर्वी हंड्रेड लीगदरम्यान तो जखमी झाला होता. स्टोक्सच्या जागी ऑली पॉप संघाचे नेतृत्व करेल.”
द हंड्रेड लीगमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना स्टोक्सला दुखापत झाली होती. ओल्ड ट्रॅफर्ड येथे मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्ध तो धाव घेतल्यानंतर अचानक थांबला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
We have announced our XI for the first Test against Pakistan in Multan 📝
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket 🦁
— England Cricket (@englandcricket) October 5, 2024
ख्रिस वोक्स अडीच वर्षांपासून ओव्हरसीज कसोटीत संधीची वाट पाहत आहे. 2016 मध्ये त्याने आशियाई मैदानावर शेवटची कसोटी खेळली होती. पाकिस्तान विरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रेडेन कार्स कसोटी पदार्पण करणार आहे. या वर्षी पदार्पण करणारा तो इंग्लंडचा सहावा कसोटीपटू ठरणार आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस वोक्स 2016 नंतर आशियातील सर्वात लांब फॉरमॅटमध्ये पहिला सामना खेळणार आहे.
Hockey India : टीम इंडियाची स्टार खेळाडू AIR INDIA वर संतापली! जाणून ‘घ्या’ कारण…
इंग्लडची प्लेइंग इलेवन : जैक क्राउली, बेन डकट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हैरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स, जैक लीच, शोएब बशीर.





