ENG vs PAK : पाकविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने केली प्लेइंग XI ची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन…

ENG vs PAK 2nd Test (ENG Playing XI) : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्या सोमवार, 15 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे.
इंग्लंडचा कायमस्वरूपी कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) दुसऱ्या कसोटीत परतला आहे. स्टोक्स इंग्लंडसाठी शेवटच्या चार कसोटींना मुकला होता. दरम्यान, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लिश संघात एकूण दोन बदल करण्यात आले आहेत.पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑली पोप इंग्लिश संघाचे नेतृत्व करताना दिसला. मात्र, आता स्टोक्सचे पुनरागमन झाले आहे.
दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांना विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मॅट पॉट्स संघात परतला असून त्याने याआधी ऑगस्टच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध संघासाठी शेवटची कसोटी खेळली होती.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची Playing XI : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर.
⬅️ Gus Atkinson
⬅️ Chris Woakes➡️ Matt Potts
➡️ Ben StokesFull focus on securing the series win 👊 pic.twitter.com/wUU8gD6q4g
— England Cricket (@englandcricket) October 14, 2024
अशा प्रकारे इंग्लंडने जिंकली पहिली कसोटी
मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजय नोंदवला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 556 धावा केल्या होत्या. या काळात कर्णधार शान मसूद, आगा सलमान आणि अब्दुल्ला शफीक यांनी शतकी खेळी खेळली होती.
त्यानंतर प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 7 बाद 823 धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून त्रिशतक (317) झळकावले. याशिवाय जो रूटने 262 धावांची खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आला आणि अवघ्या 220 धावांवर सर्वबाद झाला. अशा प्रकारे इंग्लिश संघाने एक डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला.





