ENG vs PAK 1st Test (Day 4) : एका डावात 2 द्विशतके, 400हून अधिकची भागीदारी; जो रूट-हॅरी ब्रूकनं रचली विक्रमांची मालिका….

ENG vs PAK 1st Test (Joe Root and Harry Brook) : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने आपला दुसरा डाव 8 बाद 823 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे 267 धावांची आघाडी मिळाली.
चौथ्या दिवशी जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला आणि संघाची धावसंख्या 800 पार नेली. यादरम्यान इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 322 चेंडूत 29 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 317 धावांची खेळी केली. जो रूटने देखील दुहेरी शतक लगावले. त्यानं 375 चेंडूत 17 चौकारासह 262 धावा केल्या. हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी चौथ्या विकेटसाठी 409 धावांची भागीदारी केली.
इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी एकाच डावात एकत्र खेळताना दोन द्विशतके झळकावली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा असा पराक्रम इंग्लंडकडून पाहायला मिळाला. याशिवाय इंग्लिश फलंदाजांनी 400 हून अधिक धावांच्या भागीदारीसह अनेक विक्रम रचले.
इंग्लंडकडून एकाच डावात दोन द्विशतके…
इंग्लंडकडून कसोटीच्या एकाच डावात दोन द्विशतके प्रथम 1985 मध्ये झळकावली गेली होती. ती जी ग्रॅमी फॉलर आणि माईक गॅटिंग यांनी केली होती. भारताविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या कसोटीत इंग्लिश फलंदाजांनी हा पराक्रम केला होता. ग्रॅमी फॉलरने 201 आणि माइक गॅटिंगने 207 धावा केल्या. आता रूट आणि ब्रूक यांनीही तोच विक्रम केला आहे. रूट आणि ब्रूक यांनी मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली. रूटने 305 चेंडूत द्विशतक तर ब्रुकने 245 चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले.
400 हून अधिक धावांची भागीदारी….
रूट आणि ब्रूक यांनी एकत्रित फलंदाजी करत द्विशतक ठोकले आणि 400 हून अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 400 धावांची भागीदारी पूर्ण होण्याची ही दुसरीच घटना आहे. 1957 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पीटर मे आणि कॉलिन काउड्री यांनी इंग्लंडसाठी पहिल्यांदा कसोटीत 400 हून अधिक धावांची भागीदारी केली होती.
पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक 250 धावा…
जो रूटने दुसऱ्यांदा पाकिस्तानविरुद्ध 250 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. याआधी टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग पाकिस्तानविरुद्ध दोनदा 250 हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज होता.
इंग्लंडसाठी दोनदा 250 पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू
रूटने 250 धावांचा टप्पा ओलांडला आणि विशेष यादीत आपला समावेश केला. दोनदा 250 हून अधिक धावा करणारा तो इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला.
1. वॅली हॅमंड
2. ॲलिस्टर कुक
3. जो रूट





