ENG vs PAK 1st Test (Day 4) : इंग्लंडच्या पाकविरुद्ध 7 बाद 823 धावा..! जाणून घ्या, कसोटी क्रिकेट इतिहासातील 5 सर्वात मोठ्या धावसंख्या…

Highest Innings Total In Test : पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने 7 बाद 823 धावा करून डाव घोषित केला. कसोटी इतिहासातील एका डावातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली. अशाच कसोटी डावातील सर्वात मोठ्या पाच धावसंख्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया….
1. कसोटी इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने भारताविरुद्ध ही धावसंख्या केली होती. ऑगस्ट 1997 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताविरुद्ध 952/6d (d=declare=घोषीत) धावा केल्या होत्या.
2. या यादीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने 903/7d (d=declare=घोषीत)धावा ठोकल्या होत्या.
3. त्यानंतर या यादीत पुढे जात इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. एप्रिल 1930 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इंग्लिश संघाने 849 धावा केल्या होत्या.
4. यानंतरही चौथ्या क्रमांकावर इंग्लंड आहे. सध्या चालू असलेल्या कसोटी सामन्यात (ऑक्टोबर 2024 मध्ये) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लिश संघाने 823/7d धावा केल्या आहेत.
Absolutely gargantuan 😲 pic.twitter.com/jqTL37uW8Z
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 10, 2024
5. वेस्ट इंडिज या यादीत पाचव्या स्थानावर आहे. फेब्रुवारी 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने 790/3d (d=declare=घोषीत) धावा केल्या होत्या.





