ENG vs PAK 1st Test (Day 2 Stumps) : पाकचा पहिला डाव 556 धावांवर आटोपला, प्रत्युत्तरात इंग्लंडची दमदार सुरुवात…

ENG vs PAK 1st Test (Day 2 Stumps) : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबरपासून (सोमवार) मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज 08 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी केली.
पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या आहेत तर प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्या इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 षटकांत 1 गडी गमावून 96 धावा जोडल्या असून पाकिस्तानकडे अजूनही 460 धावांची आघाडी आहे.
England are 96-1 in reply to Pakistan’s mammoth 556 at the end of day two 🏏
Scorecard: https://t.co/gDY8MeiPFN#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/6mMwQhK2x7
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 8, 2024
आपल्यासमोर डोंगरासारखे लक्ष्य असताना इंग्लिश फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही आणि मिड-विकेटवर जमालने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे डावाच्या दुसऱ्याच षटकात ऑली पोप शून्यावर बाद झाला. यानंतर इंग्लंडने त्यांच्या ट्रेडमार्क बेसबॉल शैलीत खेळणे सुरू ठेवले. जो रूट आणि जॅक क्रॉलीने 92 धावांची भागीदारी करत संघाला दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 96 धावसंख्येपर्यंत नेले. इंग्लंड अजूनही 460 धावांनी पिछाडीवर असून तिसऱ्या दिवशी त्यांच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार शान मसूद यांच्या दमदार शतकांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पूर्णपणे पाकिस्तानचे वर्चस्व दिसून आले. दुसरा दिवसही पाकिस्तानच्या बाजूने गेला आणि त्यांनी मोठी धावसंख्या उभारली. मंगळवारी 4 बाद 328 धावसंख्येवरून पुढे खेळताना नसीम शाह आणि सौद शकील यांनी संघाची धूरा हाती घेतली. दोन्ही फलंदाजांनी धावफलकावर काही धावा जोडल्या पण त्यानंतर इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले. नशीम बाद झाल्यानंतर सलमान आगा आणि शकील यांच्यात महत्त्वाची भागीदारी झाली.
सतत विकेट्स पडत असतानाही, सलमान आघाने दुसऱ्या टोकाकडून आपले आक्रमण सुरूच ठेवले आणि 119 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने शानदार 104 धावा केल्या. शाहीन आफ्रिदी क्रीजवर काही काळ टिकून राहिला आणि त्याने पाकिस्तानची धावसंख्या 500 च्या पुढे नेली, पण लीचने त्याला 26 धावांवर बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव काही वेळातच संपुष्टात आला आणि संघाने 556 धावांच्या मोठ्या धावसंख्येसह आपला डाव संपवला.





