Emerging Teams Asia Cup 2024 : टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तानपाठोपाठ यूएईला चारली पराभवाची धूळ…

Emerging Teams Asia Cup 2024 (IND-A vs UAE-A) : भारतीय संघाने इमर्जिंग आशिया कप 2024 च्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. टीम इंडियाने स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 धावांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात टिळक वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यूएईचा 7 विकेटने पराभव केला.
तथापि, मेन इन ब्लू संघाला बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी ओमानविरुद्ध गट टप्प्यातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळायचा आहे. ओमानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा टीम इंडियाच्या सेमीफायनलवर कोणताही परिणाम होणार नाही.
भारतीय संघ या स्पर्धेतील गट-अ मध्ये उपस्थित आहे. अ गटात भारताशिवाय पाकिस्तान, यूएई आणि ओमानचे संघ आहेत. या गटातून केवळ टीम इंडियानं 4 गुणांसह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. अ गटातून आणखी एक संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. आता ‘अ’ गटातून टीम इंडियाशिवाय कोणता संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Two in two for India A in the #MensT20EmergingTeamsAsiaCup 🙌
The Tilak Varma-led side register a 7-wicket win over UAE 👌👌
Rasikh Salam receives the Player of the Match for his economical 3/15 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/UdWFgOvvwc#INDAvUAE | #ACC pic.twitter.com/CHFz4N2Foh
— BCCI (@BCCI) October 21, 2024
असा झाला सामना….
यूएई विरुद्ध अल अमिराती क्रिकेट मैदानावर (मिनिस्ट्री टर्फ 1) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय संपादन केला. या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना युएई संघ 16.5 षटकात 107 धावांवरच आटोपला. यादरम्यान रसिक सलामने टीम इंडियासाठी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.
IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या टेस्टसाठी पुण्यात पोहोचली टीम इंडिया, Video मध्ये पाहा खेळाडूंची धमाल…
टीम इंडियाने 108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 10.5 षटकात 3 गडी गमावताना 111 धावा करत विजय मिळवला. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने 24 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 241.67 होता. दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंग केवळ 8 धावा काढून बाद झाला. याशिवाय कर्णधार तिलक वर्माने 18 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. शेवटी, आयुष बडोनी 12* आणि नेहल वढेरा 06* धावांवर नाबाद राहिले ज्यामुळे टीम इंडियाला विजयाची रेषा पार करण्यात मदत झाली.





