Asia Cup 2024 (SemiFinal) : अफगाणिस्ताननं भारताविरूध्द Toss जिंकला, कर्णधार रसूलीनं घेतला ‘हा’ निर्णय…

Emerging Teams Asia Cup 2024 (IND-A vs AFG-A,SemiFinal) : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पुरुष टी-20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चा दुसरा उपांत्य सामना अल अमिरातीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकला आहे. कर्णधार दरविश रसूली यानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे.
🚨 Toss 🚨
India A have been put in to bowl first against Afghanistan A
Updates ▶️ https://t.co/NSa9hqrw4v#INDAvAFGA | #ACC | #MensT20EmergingTeamsAsiaCup | #SemiFinal pic.twitter.com/Li8OaGfyT2
— BCCI (@BCCI) October 25, 2024
भारताची प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), नेहल वढेरा, आयुष बडोनी, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, रसिक सलाम, राहुल चहर, आकिब खान.
अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन : सेदीकुल्लाह अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), करीम जनात, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी.
दरम्यान, अन्य उपांत्य फेरीच्या लढतीत पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल आणि भारत आणि अफगाणिस्तानमधील विजेत्या संघाशी त्यांचा सामना होईल. टी-20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 ची विजेतेपदाची लढत ही 27 ऑक्टोबरला होणार आहे





